"योगासने कर"
"रीलॅक्सेशन म्युझिक.. माझी मुलगी लगेच झोपते"
"अॅरोमा थेरपी"
"आयुर्वेदिक औषध घे.. झोपण्याच्या गोळ्या खाण्यापेक्षा बरं!"
"जटामासी"
"सारास्वतारिष्ट"
"जायफळ?"
"फार विचार करत जाऊ नकोस. उद्याची पर्वा कशाला करतेस?"
"लग्न कर. नवरा , मुलाबाळं असली तर आयुष्याला दिशा मिळते"
"जेवण नीट कर. अचरबाचर खात बसू नकोस:
"डोळे बंद करून जप कर. कशाचाही... रामनामाचाच कर..."
काय.. काय.. काय...
मला झोप यावी.. म्हणजे रात्री... म्हणून आप्तस्वकीयांनी, मित्रमैत्रिणींनी दिलेले सल्ले.
"सल्ले काय? प्रेम आहे म्हणून सांगतात बिचारे. तुम्हाला माणसंच नको अवतीभवती. एकटी राहण्याचे हे परिणाम आहेत!"
एक ना दोन सल्ले.
विषयाला हात घालून मग वाटेल तीकडे भरकटत जाणारे. त्यातून कधी उत्सुकता, कधी प्रेम, कधी वडीलधारेपणाचा भाव (आव म्हणण्याची माझी हिम्मत नाही.) कधी भोचकपणा, कधी कुजकटपणा.. असे अनेक भाव डोकवत राहतात.
'अरे.. मुद्दा काय होता!?'
माझा विषयाकडे आणण्याचा क्षीण प्रयत्न.
"हे सगळे एकमेकांशी संलग्नच आहेत मुद्दे. आम्ही चार पावसाळे जास्त पाहिलेत."
'बरं!'
मी आपली अजूनही नेमक्या औषधाच्या शोधात. किंवा डोक्यात घोंगवणाऱ्या प्रश्नांच्या उत्तरांच्या शोधात.
ते शोधतांना निरुपयोगी असे किंवा तेच तेच हाती लागेल याची मनाची तयारी असलेली.
पण रात्रीच्या रात्री तशाच जागून संपतात. तेव्हा सोबतीला कोणी नसेल असे वाटावे.. पण घुबडं, वटवाघळं, रात्रपाळीत काम करणारी माणसं.. असंबद्ध बोलणारी RJ मंडळी.. असे अनेक निशाचर, night watchman, शिट्टी मारत काठी आपटत जाणारा गुरखा, लांबून ऐकू येणारे ट्रक्सचे आवाज... आणि कडा बदलत असलेली मी.
पण अगदी माझ्यासारखे म्हणायचं झालं तर असतीलही आणखी महाभाग. किंवा दूरच्या कुठल्यातरी तुरुंगात तोबा टेक सिंग.
मनात, डोक्यात काय विचार चालू असतात तो एक स्वतंत्र विषय होईल.
पण मुद्दा तो नव्हे. आजचा मुद्दा म्हणजे सल्ले.
तर आजचा नवीन एक सल्ला. सल्ला म्हणा, आयडिया म्हणा अथवा जाहिरात म्हणा...
तर आज कळलेले खूळ.. Boyfriend cuddling pillow.
म्हणजे काय तर उशी. उब देणारी म्हणे. पुरुषाचा शर्ट उभा कापलेल्या आकाराची.
आत.. अर्थातच कापूस.
बेसिक फिचर्स म्हणजे बळकट हात/दंड, भरदार छाती आणि पोटाचा भाग.
तोही अर्धा.
तेवढेच लागते उब द्यायला.. असो.
स्वप्नांच्या दुनियेतील मजा. fantasy!
कोणीतरी बाहुपाशात घेऊन निजवते आहे असा आभास निर्माण करणारी उशी.
कोणीतरी अस्तित्वात असो व नसो..
तो कामानिमित्त दूर गेलेला असो.. आता तसे काही अडत नाही. म्हणे... ( स्वप्नांच्या दुनियेतला तो प्रियकरच असावा. नवरा उब वैगेरे देतो?)
उब देणारा , म्हणजे देणारी उशी तर आहे ना! (बायकांना फक्त उब हवी, सेक्स नको? म्हणजे हक्काचा..?)
सोप्पे.
लगेच फोन करा.. सूट मिळवा वैगेरे वैगेरे...
आणखी शोध घेतला इंटरनेटवर... आणखी अनेक डिझाईन्स सापडली. तर घराच्या घरीच अशी उशी कशी बनवाल याचे प्रात्यक्षिकं देणारे videos पण मिळतात. "Boyfriend cuddling उशी बनवा आणि मला फोटो पाठवा.."
'बरं!'
पुरुषांसाठी मिळत असेल का अशी उशी? त्यांना असते का अशी काही गरज? त्यात काय फिचर्स असतील? भरदार हवी आणि स्तन तर नक्कीच हवे. कर्व्हज् असतील. आणखी काय लागते?
नक्कीच मिळत असेल.
शोधलं.. पण पुरुषांसाठी फार काही सापडलं नाही.
त्यांना उशीबिशीची फारशी गरज नसावी बहुदा....
**Disclaimer: I appreciate and respect the fact that the reader can be a close friend who probably helped me in my battle. There is no attempt to disrespect anyone or hurt anyone's feelings. These are only midnight scribbles.